संगमनेर : शहरात पोहोचलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त जाणता राजा मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मंचावर मुख्यमंर्त्यांशी हितगुज साधताना प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यामुळे आता महाराज आमदार थोरात यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात आ. थोरात यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत कोण निवडणूक लढविणार यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. पण, अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे हे कोणाला उमेदवारी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यातच शुक्रवारी संगमनेर शहरात भाजपाची महाजनादेश यात्रा आली होती. त्यानिमित्त जाणता राजा मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंर्त्यांच्या अगदी जवळ प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख बसले होते. बराच वेळ त्यांच्यात चर्चाही सुरू होती. त्यामुळे आता इंदोरीकर महाराज राजकारणात उतरणार आहेत, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.
मात्र राजकारण प्रवेशाबाबत इंदुरीकर महाराज यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे ”संगमनेर तालुक्यातील महाजनादेश यात्रेमध्ये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंर्त्यांकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यासाठी गेलो होतो.
धनादेश दिल्यानंतर कुठल्याही पक्षाची मफलर गळ्यात न घालता तिथून निघून गेलो. मी समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. राजकारणात मी कधीही येणार नाही.” असे त्यांनी बोलताना सांगितले आहे.
- शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी भेट! राज्य मंत्रिमंडळाने घेतलेत ८ मोठे निर्णय
- साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी एसटी महामंडळाची नवी योजना ! 27 सप्टेंबर पासून सुरु होणार विशेष बससेवा, तिकीट किती असेल?
- महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्गासाठी आणखी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर !
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाची अखेरची डेडलाईन ! ‘या’ तारखेपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश
- Reliance Power Share Price: रिलायन्स पॉवर शेअर करणार धमाल! एका दिवसात 3.51% रिटर्न…आज मिळेल प्रॉफिट?