राहुरी – तुम्ही जर जनतेची कामे केली असती तर कर्डिलेंचा राहुरीत उदय झालाच नसता, तूम्ही शिक्षण घेऊन येवढ्या पदव्या घेतल्या मग राहुरीतील संस्था कशा बंद पडल्या ते सांगा.
शहरातील माता भगिनींना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नव्हते, त्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही २९ कोटी रुपयांची पाणि योजना मंजूर करून आणली. असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिनांक १६ सप्टेंबर रोजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर राहुरी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे, रावसाहेब चाचा तनपूरे, शिवाजी सागर, विक्रम तांबे, सुरसिंग पवार, अक्षय तनपूरे, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, विक्रम भूजाडी, सुभाष वराळे,
अण्णासाहेब शेटे, योगेश देशमुख, सौ. राजश्री तनपुरे, सौ. ज्योती पोपळघट, सौ. नमिता शेटे, सौ. सुवर्णा खरे, सौ. संगिता जाधव आदि उपस्थित होते. आ. कर्डीले पूढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नगरपरिषदमध्ये तनपूरेंची सत्ता होती.
त्यांनी राहुरी शहराचा कोणता विकास केला. असे म्हणत त्यांनी तनपू रेंवर कडाडून टिका केली. वाढीव पाणी पुरवठा योजनेला शासनाची तत्वतः मान्यता मिळवून दिल्या बद्दल आमदार कर्डिले यांचा जाहीर सत्कार समारंभ तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक अहमदनगर यांच्या वतीने मुद्रा लोन योजने अंतर्गत साई महिला बचत गट राहुरीस ४८ लक्ष रूपयांचे कर्ज वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी नवीपेठ येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विरोधीक्षनेते दादापाटील सोनवणे हे होते. यावेळी सोनवने म्हणाले कि, इतकी वर्षे सत्ता असून तूम्ही काय केले. जनतेला तूमच्या कामाची पावती द्या. राहुरी शहराला २९ कोटी रुपयांची पाणि योजना मंजूर झाली.
त्याचे सर्व श्रेय आ. कडीले यांचे आहे. असे सागून त्यांनी तनपूरेंवर तोफ डागली. यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी कडाडून टिका करत, प्रत्येक टेंडरमध्ये सत्ताधारी कमिशन खाण्याचे काम करत आहे. असा आरोप चाचा तनपुरे यांनी केला आहे. तसेच डॉ. धनंजय मेहेत्रे, प्रकाश पारखे, डॉ. संजय भळगट, शहाजी ठाकूर, शिवाजी सागर – आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
- पुणे – नगर महामार्गावर डबल डेकर उड्डाणपूल! वर मेट्रो, खाली बस धावणार, कसा असणार रूट?
- लाडक्या बहिणींसाठी Good News ! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार, वाचा डिटेल्स
- मोठी बातमी ! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंची मोठी घोषणा, आता महिलांना मिळणार बिनव्याजी 100000 रुपयांचे कर्ज
- वाईट काळ कायमचा निघून जाणार! ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल, मनातील अनेक इच्छा पूर्ण होणार
- राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार चार दिवसांची शासकीय सुट्टी !