अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाला जी गती मिळाली नाही. ती गती भाजप सरकारच्या काळात मिळाली. यामुळे नगर राहुरी पाथर्डी मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला.
बजेटच्या रस्त्यासाठी दोन कोटी निधी मिळत होता. मात्र आता भाजप सत्तेवर आल्यापासून दरवर्षी २५ते ३० कोटी रुपयांचा निधी या बजेटच्या माध्यमातून रस्त्यासाठी मिळत आहे. पंचवीस वर्षाचा निधी पाच वर्षात भाजप सरकारमुळे मिळाला असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती, मांजरसुंबा अंतर्गत रस्ते, पिंपळगाव माळवी ते वांबोरी फाटा रस्ता दुरुस्ती, आढाववाडी अंतर्गत रस्ते, मेहेर बाबा फाटा रस्ता दुरुस्तीआदि विकास कामाचा शुभारंभ आ.कर्डिले यांच्या हस्ते पिंपळगाव माळवी येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास बाजीराव गवारे, संभाजी पवार, सरपंच सुभाष झिने, प्रा.देवराम शिंदे, माजी सरपंच संतोष झिने, एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड, इंद्रभान कदम, सागर गुंड,नानासाहेब झिने, बापू बेरड, गंगाधर पटारे, जानकीराम बनकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ.कर्डिले म्हणाले की, मागील पाच वर्षात सर्वाधिक विकास निधी भाजप सरकारमुळे मिळाला. राज्यात पुन्हा सत्तेवर भाजप सेनेच सरकार येणार असल्यामुळेच राष्ट्रवादीतील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात. वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये पिंपळगाव माळवी येथील तलावाचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
- दिल्ली, बडोद्यानंतर आता पुण्यात सुरु होणार अनोखी बस ! CNG, डिझेल, वीज नाही तर ‘या’ इंधनावर धावणार
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा जीआर ! आता….
- पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकरकमी इतकी गुंतवणूक करा, दरमहा मिळणार 6000 रुपयांचे व्याज
- लाडक्या बहिणींसाठी Good News! ‘या’ महिलांना आता एक रुपयाही व्याज न देता एक लाख रुपयांचे कर्ज मिळणार, मंत्री तटकरेंची माहिती
- ‘ही’ कंपनी एकाच वेळी शेअर होल्डर्स ला देणार बोनस शेअर्स आणि डिव्हिडंटची भेट