सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावल्यामुळे धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी शनिवारी बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणात शनिवारी सायंकाळी १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी आहे. शुक्रवारी धरणाचे सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी वर उचलून त्यातून विनावापर पुर्वेकडे पाणी सोडण्यात येत होते.

परंतु पाऊस मंदावला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाल्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणि विसर्ग २१०० क्युसेक ठेवण्यात आला आहे. धरणातील पाणीपातळी २१६३.०२ फूट झाली आहे. दिवसभरात कोयनानगर १ एकुण ६९२७, नवजा ४ एकूण ८०५७ आणि महाबळेश्वर येथे ६ एकूण ६९९२ मि. मी. पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.
- राज्यातील वातावरणात मोठा बदल; अलर्ट जारी, ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
- गृहकर्ज घेताय? ‘ही’ सोपी युक्ती वापरली तर 50 लाखांच्या कर्जात 18 लाखांपर्यंत होऊ शकते बचत
- यंदाच्या अर्थसंकल्पात पीएम किसान निधीत वाढ होणार का? फेब्रुवारीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ‘इतक्या’ रुपयांचा हप्ता
- खासगी आराम बसच्या तिकीट दरात वाढ; प्रवाशांना खिशाला कात्री
- आठवडाभरातील घसरणीनंतरही ब्रोकरेज हाऊसेसचा ‘Buy’ वर भर; बँकिंगपासून कंझ्युमर सेक्टरपर्यंत निवडक शेअर्सवर विश्वास कायम













