अकोले ;- दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला.
पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला. विधानसभेला राष्ट्रवादीला निवडून द्या, त्यांचं ( सीताराम गायकर ) यांचं धोतर फेडू,
असं म्हणत अजित पवारांनी पिचडांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवला.
आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देणार. दिली नाही तर पवारांची औलाद नाही. थोर पुरूषांची नावं घेऊन सत्तेवर आले. पण कोणतंही आश्वासन पूर्ण केली नाहीत.
गड किल्यात आता छमछम सुरू करणार. आम्ही बंद केलेले डान्स बार यांनी सुरू केले, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
- मागराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ
- मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 750 एकर जमीन सक्तीने ताब्यात घेतली जाणार
- एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज ! एसटी महामंडळाने सुरू केली खास योजना, फक्त 585 रुपयात….
- म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीचा मुहूर्त लांबला! आता ‘या’ महिन्यात निघणार सोडत, म्हाडाने दिली मोठी माहिती