अहमदनगर :- शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावली. तसेच उमेदवारीसाठी इछुक असलेले अनिल शिंदे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हेही आता राठोड यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत.
अनिल राठोड हे शिवसेनेचे उमेदवार असून शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात अनिल राठोड यांनी आज दुपारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली.

या बैठकीला शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम हेही या बैठकीला हजर राहिले.
बैठक संपल्यानंतर अनिल राठोड व जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे शिवालयात गेले असता, त्याठिकाणी अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी येऊन राठोड यांची भेट घेतली व शिवसेनेत सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.
दरम्यान शिवसेनेकडून महापौरपद देण्यात न आल्याने अंबादास पंधाडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. तर, मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत राजेंद्र राठोड यांनी शिवसेनेचे शिवबंधन तोडत हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले होते.
पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असलेले अंबादास पंधाडे व राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावत पुन्हा शिवसेनेत सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले.
- नाशिक ते अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरू झाली इलेक्ट्रिक बस, वेळापत्रक अन तिकीट दर पहा….
- चारचाकी वाहन शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार देणार 5000 रुपयांचे अनुदान, कुठं करावा लागणार अर्ज?
- समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ 3 दिवस महामार्ग बंद ठेवला जाणार, कारण काय?
- यावर्षी सोन्याच्या किमतीत 70% आणि चांदीच्या किमतीत 150 टक्क्यांची वाढ ; 2026 मध्ये सोन आणखी किती वाढणार ?
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! OYO चा IPO येणार, महत्त्वाच्या प्रस्तावाला मिळाली मंजुरी, वाचा डिटेल्स