मुंबई : अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केली. आम्ही हा खेळ संपवू, असा इशारा देतानाच ‘अबकी बार आघाडी १७५ पार’ असा नारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सोमवारी दिला.
काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर अजित पवार बोलत होते. भारत भालके आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

ते सर्वात आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. कालांतराने ते काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांना राष्ट्रवादीची विचारधारा पटली म्हणून आता ते राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत. पांडुरंग बरोरा आणि त्यांचे वडील पवार यांचे कट्टर समर्थक. मात्र पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
- आज गुंतवणूक सुरु करा, 21 व्या वर्षी मिळणार 71 लाख रुपये ! ही सरकारी योजना ठरणार गेमचेंजर
- अरबी समुद्रात वादळाची निर्मिती होणार ! आज आणि उद्या महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? कुठं पाऊस पडणार?
- शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना पण टीईटी द्यावी लागणार का ? वाचा….
- सोन्यात गुंतवणूक करताय ? पुढील दोन-तीन वर्षात सोन्याच्या किमती किती वाढतील ? वाचा…
- ‘या’ राशीच्या मुली असतात जन्मता भाग्यवान ! कधीच भासत नाही पैशांची तंगी













