संगमनेर :- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार थोरात कुटुंबीयांकडे जंगम व स्थावर अशी सुमारे बारा कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात दहा कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

तर सुमारे दोन कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. परंतु थोरात यांच्यासह त्यांच्या कुटुंबाकडे एकही वाहन नसल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात हे पुणे विद्यापीठातून बीए झाले असून, पुण्यातील इंडियन लॉ सोसायटीच्या विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे.
बाळासाहेब थोरात, पत्नी कांचन, मुलगी डॉक्टर जयश्री, मुलगा राजवर्धन असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबाकडे एकत्रितपणे रोख रक्कम, ठेवी, सोने अशी १ कोटी ९८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
बाळासाहेब थोरात यांच्याकडे ८८ लाख ६६ हजार, त्यांच्या पत्नीकडे ६९ लाख, मुलीकडे १३ लाख ५९ हजार, मुलाकडे २७ लाख १४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
त्यांच्या पत्नीकडे १ किलो १७० ग्रॅम सोने आहे. तर थोरात कुटुंबीयांकडे १० कोटी १० लाख रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता आहे. त्यात काही वडिलोपार्जित शेती आहे.
थोरात यांच्या नावावर ५ कोटी ६६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. संगमनेरमधील जोर्वे येथे थोरात व त्यांच्या पत्नीच्या नावे सुमारे १४ एकर शेती, संगमनेर शहर, जोर्वे येथे रहिवासी इमारत आहेत. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नसल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.
- पश्चिम रेल्वेचा महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ 9 स्थानकातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?
- आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार खरंच दुप्पट होणार का ? ‘ही’ सिक्रेट गोष्ट कोणीचं सांगणार नाही तुम्हाला
- महाराष्ट्रातील हवामानात अचानक मोठा बदल ! ‘या’ गावांमध्ये आज आणि उद्या ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता
- सासू-सासर्यांच्या घरावर सुनेचा अधिकार किती ? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल
- Share Market मधील ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना देणार Dividend ; शेअर्सने 5 वर्षात दिलेत 900% रिटर्न













