राहाता : तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथे गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गॅस टाकीचा स्पोट झाला. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे शेजारील घरांचेदेखील नुकसान झाले.
वाकडी येथील पूर्वेस असलेल्या चितळी रोड, शिरगिरे आखाडा भागात पाटबंधारे विभाग हद्दीत राहात असणाऱ्या हौशिराम तुकाराम पगारे यांच्या पत्नीने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटविला असता रेग्युलेटरमधुन जाळ निघून गॅस पेट घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यावेळी त्यांनी भयभीत होत लगेचच आरडाओरडा केला. घाईने पाच शेळ्या घराबाहेर घेतल्या. त्यानंतर घरातील इतर संसारोपयोगी वस्तु बाहेर घेण्याचा प्रयत्न सुरू असताना शेजारील लोकांनी त्यांना मज्जाव केला. काही मिनिटांत भडका झालेल्या गॅस टाकीचा भीषण स्पोट झाला. त्यामुळे त्यांच्या घराने पेट घेतला.
स्पोट इतका मोठा होता, की सुमारे दोन किमी परिसरात तीव्रता जानवली. स्पोट झाल्यावर शेजारील लोकसुद्धा दूरवर पळाले. घटनेनंतर कैलास लहारे यांनी गणेश कारखान्यात संपर्क साधत अग्निशामक गाडी बोलावली. त्यानंतर आग विझली; मात्र तोपर्यंत पगारे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले होते. ही आगीची तीव्रता इतकी होती की शेजारील चार घरांचेसुद्धा नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
- सॉव्हरेन गोल्ड बॉण्डवरील कर नियमांत मोठा बदल; गुंतवणूकदारांनी काय जाणून घ्यावे?
- खाजगी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्यांना EPFO EPS अंतर्गत किती पेन्शन मिळेल?
- चार दशकांची प्रतीक्षा संपली! ऐतिहासिक कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला अखेर गती
- म्हाडाकडून ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर १२० घरे विक्रीसाठी; ५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
- ग्रॅच्युइटी म्हणजे काय? कसे होते कॅल्क्युलेशन, किती रक्कम मिळते? जाणून घ्या सविस्तर माहिती













