पुणे:- बेकायदेशीररीत्या जमाव जमवून तसेच महानगरपालिकेची परवानगी न घेता दिवंगत कुख्यात गुंड संदीप मोहोळच्या स्मृतिदिनानिमित्त फ्लेक्स लावणाऱ्या आठ जणांविरुद्ध पाेेलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रवीण चंद्रकांत जागडे, राहुल भगवान जागडे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत, तर हेमंत दाभेकर, राजू चव्हाण, नितीन साबळे, दीपक शिंदे, विश्वजित निकम, शंकर भिमाजी मोहोळ यांच्यावर गुन्हे नाेंद आहेत. पालिकेची परवानगी न घेता नऱ्हे रस्त्यावर विद्युत खांबाला दिवंगत गुंड संदीप मोहोळचे फ्लेक्स लावले होते.

- अजिंठा एक्स्प्रेस भुसावळवरून सुरू होणार का? उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची प्रतीक्षा कायम
- ईपीएफओ 3.0 मुळे पीएफ काढणे झाले सुपरफास्ट; काही तासांत खात्यात जमा होणार पैसे
- बाली-थायलंडलाही मागे टाकणार सिंधुदुर्गातील निवती; पर्यटनातून स्थानिकांसाठी हक्काचा रोजगार
- शासकीय दुखवट्यामुळे झेडपी-पंचायत समिती निवडणुका पुढे; सीटीईटी शिक्षकांना मोठा दिलासा
- नोकरी सोडून दुग्ध व्यवसायात झेप; हरिओम नौटियाल यांनी उभारला दोन कोटींची उलाढाल असलेला ग्रामीण उद्योग













