पुणे ;- येत्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या अनेक भागांत तसेच कोकणात व गोव्यात ७ आणि ८ ऑक्टोबर या दोन दिवसांत पाऊस पडेल.
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरी बरसतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुलाबा वेधशाळेनुसार यंदा थंडीचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड येथे या ऋतुबदलाचे ताजे संकेत मिळाले असून अपेक्षेपेक्षा आधीच हिमवर्षाव सुरू झाला आहे. पंजाब, हरियाणा परिसरात किमान तापमान आत्ताच १७ अंशापर्यंत खाली आले आहे.
राज्यात महाबळेश्वर येथे १६.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर नगर १७.८, नाशिक १८.६, बीड १८.४, औरंगाबाद १८.२, पुणे २०, सातारा -सांगली २० असे किमान तापमान नोंदवले गेले.
- मार्च 2026 पासून एटीएम मधून 500 रुपयांच्या नोटा निघणार नाहीत ? सरकारकडून मिळाली मोठी माहिती
- फडणवीस सरकारचा लाडक्या बहिणींना दिलासा ! मुदतीनंतरही केवायसी प्रक्रिया सुरूच, 31 जानेवारीपर्यंत केवायसी करता येणार ? वाचा….
- महाराष्ट्रात नाही तर ‘या’ राज्यात आहे भारतातील सर्वाधिक मोठा जिल्हा ! जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8 राज्यांपेक्षा अधिक
- मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट किती असणार ? कसं राहणार वेळापत्रक? रेल्वे मंत्र्यांकडून मोठे अपडेट
- ज्याची भीती होती तेच घडलं, लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारचा धक्कादायक निर्णय !