अहमदनगर ;- मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणुकी साठीची मतमोजणी प्रक्रिया ही त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे.
त्याची सर्व तयारीही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. त्याठिकाणी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे. विशेषता तेथील सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असणार आहे.

तेथील मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही, व्हीडिओग्राफीची सुविधा, मतमोजणी केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती, मतमोजणी केंद्राच्या परिसरातील चोख सुरक्षा व्यवस्था अशा पद्धतीने आपण तयारी करण्यात आली आहे.
अकोले : पॉलिटेक्निक कॉलेज
संगमनेर : सहकार महर्षी थोरात स्पोर्टस कॉम्प्लेक्स
शिर्डी : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,राहता
कोपरगाव : सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल
श्रीरामपूर : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, श्रीरामपूर
नेवासे : सेंट मेरी शाळेजवळील नवीन गोदाम
शेवगाव : तहसील कार्यालय, शेवगाव
राहुरी : रामदास धुमाळ महाविद्यालय, स्पोर्टस हॉल
पारनेर : न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर
नगर शहर : नागापूर एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम
श्रीगोंदे : सरकारी ग्रीन गोडाऊन पेडगाव रस्ता, श्रीगोंदा
कर्जत-जामखेड : नवीन तहसील कार्यालय, सरकारी गोडावून, कर्जत
निवडणूक निर्णय अधिकारी.
कर्जत-जामखेड : अर्चना नष्टे, नगर शहर : श्रीनिवास अर्जुन, नेवासे : शाहूराज मोरे, श्रीगोंदा : अजय मोरे, पारनेर : सुधाकर भोसले, राहुरी : महेश पाटील, श्रीरामपूर : अनिल पवार, राहाता : गोविंद शिंदे, कोपरगाव : राहुल मुंडके, संगमनेर : शशिकांत मंगरुळे, अकोले : उदय किसवे, शेवगाव पाथर्डी : देवदत्त केकाण.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ