कोपरगाव :- राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय व युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव अनेकांसाठी अनपेक्षित होता. कोल्हेंशिवाय अन्य उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच धारणा राजकीय वर्तुळात झाली होती, परंतु जनमानसात कोल्हेंबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेत आशुतोष यांनी विजयश्री खेचून आणली.
त्यांच्या विजयामागे अनेक शिलेदार आहेत. छुपे मतदानही काळेंच्या पारड्यात पडले. मागच्या पराभवाचा वचपा काढत कमी फरकाने का होईना, परंतु ते निवडून आले. निवडणूक काळात काळे समर्थक विजय आढाव गट कोल्हेंना जाऊन मिळाला, नितीन औताडेंनीही समर्थन दिले.

शिवाय सेनेतील राजेंद्र झावरे गटाचीही मदत झाल्याने कोल्हे यांचे पारडे जड झाले. काळे यांनी वेगळी रणनिती अवलंबली. मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवले. कोल्हेंवर नाराज असणाऱ्यांनी काळेंना मदत केली. राजेश परजणे व विजय वहाडणेंचा विखारी प्रचार कोल्हेंविरुद्ध चालूच होता, तो काळेंच्या पथ्यावर पडला.
कोल्हे व समर्थकांना फाजील आत्मविश्वास नडला. कोल्हेंनी वहाडणेंना नाहक महत्त्व देऊन टीका केली. काळे व परजणे स्पर्धकच नाहीत, या थाटात त्यांनी प्रचार केला. कोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले.
- शासनाचा नवा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार चौपट मोबदला
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन वर्षात मिळणार दुहेरी भेट ! 2026 च्या सुरुवातीलाच मिळणार ‘हे’ 2 मोठे लाभ
- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्यातील ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत मोठा बदल, नवीन टाईम टेबल आत्ताच नोट करा
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! जामनगर – तिरूनेलवेली एक्स्प्रेस आणि पोरबंदर – तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसला ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर
- Tata पुन्हा मार्केट काबीज करणार ! 2026 मध्ये लॉन्च होणार तीन नवीन SUV