नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहिती नुसार नोव्हेंबर महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात बँका बंद राहणार आहे.
या महिन्यात छट पुजा, गुरू नानक जयंती, कन्नड राज्योत्सव, वांग्ला फेस्टिव्हल, कनकदास जयंती, ल्हाबब टुचेन, सेंग कट स्नेम आणि रविवारचा समावेश आहे. १ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू आणि इम्फाळमध्ये कन्नड राज्योत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दोन नोव्हेंबर रोजी पाटणा आणि रांचीत छट पुजा असल्याने सुट्टी आहे. ३ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सर्व राज्यांतील बँकांना सुट्टी आहे. ८ नोव्हेंबर रोजी शिलाँगमध्ये वांग्ला फेस्टिवल असल्याने सुट्टी आहे. ९ नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांना दुसरा व चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.

१० नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सर्व राज्यांना सुट्टी आहे. १२ नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंती निमित्त बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगरमधील शहरात बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.
१५ नोव्हेंबर रोजी कनकदास जयंती आणि ईद उल मिलाद उल नबी निमित्त बंगळुरू, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुट्टी आहे. १७ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सर्व राज्यातील बँकांना सुट्टी आहे.
१९ नोव्हेंबर रोजी ल्हाबब दुचेन निमित्त गंगटोकमध्ये बँकाना सुट्टी आहे. २३ नोव्हेंबर रोजी चौथा शनिवारमुळे सर्व राज्यांना सुट्टी आहे. २४ नोव्हेंबर रोज रविवार असल्याने सर्व राज्यातील बँकांना सुट्टी असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या सुट्ट्याचा महाराष्ट्र राज्यावर फारसा परिणाम पडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
- फक्त 333 रुपयांची गुंतवणूक बनवणार लखपती ; 1700000 रुपये मिळणार, कशी आहे नवीन योजना?
- नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात…! जानेवारी महिन्यात लॉन्च होणार 3 SUV कार, आतापासूनचं पैसा तयार ठेवा
- सावधान ! 2026 ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार कष्टाचे, बुध ग्रहाची केतूच्या नक्षत्रात होणार इंट्री
- Jio ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच ! 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 28 दिवसांची व्हॅलिडीटी
- शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! पुणेकरांची प्रतीक्षा वाढणार, मार्च 2026 ची डेडलाईन पण….