बाजार समितीच्या आवारातून दोन टन कांदा चोरला

नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून व्यापार्‍याने शेतकर्‍याकडून खरेदी केलेला दोन टन 934 किलो कांदा चोरून नेल्याची घटना 4 जानेवारी रात्री घडली. 
याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांदा व्यापारी बाळासाहेब बायाजी आंधळे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.आंधळे नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा व्यापारी आहेत.

यासाठी त्यांनी बाजार समितीचा एक गाळा घेतला आहे. शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या कांदा ते गाळ्यात टाकत असतात. 

4 जानेवारीला रात्री गाळा उघडा असताना चोरट्याने 55 हजार 500 रूपये किंमतीचा दोन टन 934 किलो कांदा चोरून नेला. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिंदे करत आहे.