अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबतची माहिती, जाणून घ्या तुमच्या परिसरात किती आहेत कोरोना बाधित …

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत ३१ करोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी तब्बल १८ रुग्णांनी ‘करोना’वर मात केली आहे.

यामध्ये १७ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून एकाला हॉस्पिटलमध्येच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

तर, कोपरगाव व जामखेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे. उर्वरीत ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तालुकानिहाय कोरोना रुग्ण पुढीलप्रमाणे ;- 

नगर : ११

जामखेड : ९

संगमनेर : ४

राहाता : १

नेवासे : ४

कोपरगाव : १

आष्टी (जि. बीड) : १

एकूण : ३१

(४ जण परदेशी नागरिक आहेत)

जिल्ह्यात आढळलेले एकूण ‘करोना’बाधीत रुग्ण : ३१

एकूण रुग्णांपैकी ‘करोना’मुक्त झालेल्यांची संख्या : १८

‘करोना’मुळे झालेले मृत्यु : २ (कोपरगाव व जामखेड)

सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले रुग्ण : ११

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ हजारांच्या पुढे

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे.