अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक आणि दुकानदारांसाठी महत्वाची बातमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.गृहमंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे.

कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून सगळीकडे अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला वगळता मॉल्स, व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि अन्य प्रकारची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सवलत देण्यात आली आहे.केंद्राच्या आदेशानंतर राज्य सरकार आता त्यांची ऑर्डर काढणार आहे. त्यानुसार राज्यात कोणती दुकान सुरू होतील आणि कुठे ते स्पष्ट होईल.

मात्र लॉकडाऊन काळात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने ज्या उद्योग-आस्थापनाना सवलती दिल्या आहेत, त्या वगळता जिल्ह्यातील कोणतीही आस्थापना अथवा दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरू करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व नागरिकांनी आणि दुकानदारांनी याची नोंद घ्यावी तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये. लॉकडाऊन काळातील सर्व नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe