कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोरक्षनाथ गडावरचे धार्मिक कार्यक्रम बंद!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गोरक्षनाथ गडावर संपूर्ण श्रावण महिन्यात दर्शन, मूर्तीला पाणी घालणे, पारायण करणे, भंडारा( महाप्रसाद) आदी धार्मिक कार्यक्रम शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत मंदिर बंद राहणार आहेत.

यावर्षी शासनाच्या निर्णयानुसार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोरक्षनाथ गडावर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. सर्व नाथभक्ताना, भाविकांना विनंती आहे,

यावर्षी पुढील आदेश येईपर्यंत कुणीही दर्शनाला, भंडार्‍याला येऊ नये, असे आवाहन देवस्थानच्यावतीने अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाने केले आहे.

अहमदनगर जवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर संपूर्ण श्रावण महिन्यात भंडारा संपन्न होतो. हजारो वर्षाची ही परंपरा यावर्षी कोरोनामुळे खंडित करण्यात आली आहे.

नवनाथ भक्तिसारमध्ये या ठिकाणाचे महत्व सांगितले आहे. स्री राज्यातून परत येताना मच्छिंद्रनाथांनी सोन्याची वीट बरोबर आणली होती. ती याठिकाणी ऋषी, मुनी, देव आदि साठी भंडारा करण्यासाठी ती गोरक्षनाथांनी फेकून दिली.

तेव्हा मच्छिंद्रनाथाचा राग अनावर होऊन त्यांनी तांडव केले. गुरुला शांत करण्यासाठी गोरक्षनाथांनी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला

आणि गुरुंच्या इच्छापूर्तीसाठी सर्वाना निमंत्रण देऊन याठिकाणी संपूर्ण श्रावण महिन्यात महायज्ञ करुन अन्नदान केले, अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाविक याठिकाणी भंडारा करतात.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]