राज्यातील मंदिरे कधी सुरु होणार? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यातील धार्मिक स्थळे कधी उघडणार याबाबत आज मुख्यमंत्र्यानी खुलासा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.

मागील काही दिवसांपासून मंदिरं, लोकल आणि जीम सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, इतक्यात तरी राज्यातील मंदिरं, लोकल, जीम सुरू होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

तसेच मुंबई लोकल कधी सुरू होणार याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.

कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. राज्यांतर्गंत हरिद्वारपर्यंत वाहतूक सुरू झाली आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जीम सुरु करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली आखून देऊ असं ते म्हणाले. जीममध्ये व्यायाम करताना, हार्टच पम्पिंग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढतो आणि त्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved