विनाकारण त्रास देणाऱ्या पोलिसांच्या विरोधात या संघटनेने केले आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  कायद्याचा गैरवापर करीत मेंढपाळ कुटुंबाला विनाकारण त्रास देणाऱ्या राहुरी तालुक्याचे पोलिस निरीक्षक देशमुख यांची चौकशी करावी व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमवारी (दि.२६ ऑक्टोंबर) रोजी १२ वाजता राहुरी पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे.

हे आंदोलन यशवंत सेना व पुण्यश्लोक आहिल्यबाई होळकर सामजिक प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी अनेक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पांठिबा दिला आहे.

दरम्यान धारदार हत्याराने मारहाण केल्याच्या आरोपावरून घोरपडवाडी येथील मेंढपाळ विठ्ठल बाचकर व त्यांच्या तीन मुलांविरुद्ध पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या आदेशाने पोलिस कर्मचारी चव्हाण यांनी खोटा गुन्हा नोंदविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

यामुळे असे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, यासाठी राहुरी पोलिस ठाणे समोर यशवंत सेना व पुण्यश्लोक आहिल्यबाई होळकर सामजिक प्रतिष्ठाणच्या वतिने जिल्हा अध्यक्ष विजय तमनर यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक देशमुख यांची चौकशी करून त्यांच्याकडून तपास काढून घ्यावा. बाचकर कुटुंबावरील गुन्हा रद्द करावा अशी मागणी यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच जबाबदार पोलिस अधिकारी आल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्याचे विजय तमनर यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment