‘भाजपमधील ‘तो’ वाद म्हणजे भाजपमधील नेत्यांची राष्ट्रवादीकडे वाटचाल’; महाविकास आघाडीतील ‘ह्या’ मंत्र्यांचा गौप्यस्फोट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही.

उलट आमची पाच वर्षे व्यवस्थित व अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत की, पुढची पाच वर्ष आम्ही तिथेच असणार आहोत,’ असा दावा करत ‘लवकरच सरकार पडेल’ असे सातत्याने सांगणाऱ्या भाजप नेत्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टोला लगावला.

‘आगामी काळात नगर जिल्ह्यातील भाजपचे जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील,’ असेही ते म्हणाले.

नुकतेच श्रीरामपूर येथील भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर पक्ष संपवण्याचा आरोप करत भाजपाच्या २३१ पैकी २१३ बूथ प्रमुखांनी शनिवारी राजीनामा दिला.

अनेकांना जिल्हा आणि तालुका कार्यकारणीत डावलल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे श्रीरामपूर येथे भाजपाला खिंडार पडलं. या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केले आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचं सरकार आमचं ५ वर्ष पूर्ण करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, ५ वर्ष व्यवस्थित पूर्ण होणार असून त्यापुढीलही ५ वर्ष आमचं सरकार असणार आहे.

त्यामुळे नजीकच्या काळात नगर जिल्ह्यातील भाजपाचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तरेत श्रीरामपूरमध्ये भाजपाचे मोठे संघटन आहे. श्रीरामपुरातील कार्यकारिणी निवडीचा वाद थेट प्रदेशस्तरावर पोहोचला होता. जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी घोषित झाल्या.

मात्र तरीही श्रीरामपूरच्या निवडी मात्र होऊ शकल्या नव्हत्या. मात्र जिल्ह्यातील या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment