अबब! शिक्षक म्हणून नोकरीला लावतो सांगत तब्बल 58 लाखांना गंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- समाजात अनेक फसवणुकीचे फंडे निघाले असून अनेक सामान्यांना यात अडकवले जाते. अनेकांना लाखोंना गंडा घातला जातो. वाढती बेरोजगारीमुळे सध्या नोकरीला लावतो असे सांगत फसवणे खूप मोठा फंडा झाला आहे. अशीच एक फसवणुकीची घटना समोर आली आहे.

यात तब्बल 7 जणांना 58 लाख रुपयांना गंडा घातला आहे. ही फसवणुकीची घटना सन 2014 ते 7 सप्टेंबर 2020 या कालावधीत राहाता येथे घडली आहे.

याप्रकरणी धिरज प्रकाश पाटील, रा. साकुरी, ता राहाता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी दिनेश गोविंद सोनवणे, पत्नी बिना दिनेश सोनवणे (गायकवाड), नाशिक जिल्हा भाऊसाहेब पांडुरंग पेटकर (लोणी) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिघेही आरोपी फरार झाले आहेत.

यातील फिर्यादी धिरज पाटील हे साकुरी येथे राहत असताना बिना सोनवणे व दिनेश सोनवणे यांची ओळख झाली. पाटील पती-पत्नी हे दोघे बीएबीएड असल्याने तुम्हाला रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावून देतो. त्यासाठी 20 लाख रुपये घेतले.

तसेच सुधाकर जाधव राहाता यांना तलाठी म्हणून नोकरी लावण्यासाठी 10 लाख 44 हजार, प्रगती किरण खडांगळे, रा. साकुरी 2 लाख, घनशाम शिवदास खैरनार (रा. महाड, जि. रायगड) याच्याकडून नोकरीसाठी 8 लाख,

सागर कांतिलाल खैरनार 3 लाख, अरूणा गणेश पडवळ रा. राहाता 6 लाख 40 हजार, संजीवनी सोनवणे 3 लाख 10 हजार, कल्पेश रमेश पथके 5 लाख अशी सात जणांकडून विविध खात्यात नोकरी लावून देतो असे सांगून 57 लाख 94 हजार रूपये घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment