आशिष निनगुरकर यांच्या ‘कुलूपबंद’ लघुपटाला बेस्ट शॉर्टफिल्म व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  अखिल भारतीय महाक्रांती चित्रपट आघाडी सेना यांच्या विद्यमाने आयोजित ‘मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टीवल स्पर्धेत’ येथील आशिष निनगुरकर लिखित-दिग्दर्शित ‘कुलूपबंद’ या लघुपटाला ‘बेस्ट शॉर्टफिल्म- प्रथम पुरस्कार’ व ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन मध्ये घरी राहून कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी ‘ऑनलाइन मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टिवल’ भारतीय महाक्रांती चित्रपट आघाडी सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

सदर फेस्टिवलमध्ये एकूण नव्वद लघुपटांमधून नगरच्या काव्या ड्रीम मुव्हीज व किरण निनगुरकर निर्मित ‘कुलूपबंद’ या लघुपटाने परिक्षकांची पसंती मिळवत लघुपटांमधील ‘प्रथम लघुपट पुरस्कार’ व आशिष निनगुरकर यांना ‘दिग्दर्शनासाठीचा प्रथम पुरस्कार’ प्राप्त केला आहे.

‘सुरक्षित अंतर पाळा, कोरोना संसर्ग टाळा’ असा ‘क्वारंनटाईन’चा सामाजिक संदेश देणाऱ्या या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन,कॅमेरावर्क व निर्मिती व्यवस्थापन अशी चौफेर धुरा आशिष निनगुरकर यांनी सांभाळली आहे.

या लघुपटात स्वरूप कासार व अनुराग निनगुरकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.कोरोनाच्या या काळात घरच्याघरी राहून निर्मिती केलेल्या व ‘कोरोना’ बाबत जनजागृती केलेल्या ‘कुलुपबंद’ या लघुपटाने बेस्ट शॉर्टफिल्म प्रथम पुरस्कार मिळवल्याबद्दल टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेसाठी अविनाश सकुंडे,प्रशांत पांडेकर,राजशेखर तलवार आदी परीक्षक व आयोजकांनी ‘कुलूपबंद’ टीमचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved