महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील या तलावाने उन्हाळ्यापूर्वी गाठला तळ

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली येथील यावर्षी तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने तळ गाठला आहे.

यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.माहुली येथील पाझर तलाव हा यंदाच्या पावसाळ्यात तुडूंब भरून वाहत होता. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मात्र, आता तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने तळ गाठल्याने पाण्याचे नागरिकांसह शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून या पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

तर काही शेतकर्‍यांनी लगतच बोअरवेल घेतल्याने पाणी जिरत आहे. परंतु, यंदा तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे ढग दाटू लागले आहेत.