राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला नगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- कोरोनाने राज्यात हाहाकार उडविलेला असताना, राज्यातील ग्राऊंड लेवलची परिस्थिती व पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचा आढावा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्याशी झूम अ‍ॅपद्वारे ऑनलाईन संवाद साधला.

जयंत पाटील यांनी कोरोनाची गंभीर परिस्थिती हाताळताना पदाधिकार्‍यांना विविध सूचना व मार्गदर्शन केले.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संदर्भात परिस्थितीची माहिती देताना आमदार संग्राम जगताप कोरोनाग्रस्त परिवारासाठी दिवसभर उपलब्ध राहून मदतीचा हात देऊन कर्तव्य बजावत असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी ऑनलाईन बैठकित स्पष्ट केले.

या बैठकित जंयत पाटील या बैठकित राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व प्रशासकीय मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बरोबर राज्यातील सद्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्नाची माहिती दिली.

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यात स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांच्या मदतीने कोरोनाने पिडीत कुटुंबीयांना मदत, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरु करण्याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच पदाधिकार्‍यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी चर्चा केली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी मार्फत हाँस्पिटल मध्ये पेशंटला बेड उपलब्ध करून देण्यासाठी पदाधिकार्‍यांनी मदत करावी,

महात्मा फुले जन आरोग्य अंतरगत विनामुल्य काही आरोग्य टेस्ट केल्या जातात त्याची नागरिकांना माहिती करून देणे, काही हंगामी तत्वावर काम करण्यासाठी नेमलेल्या आरोग्य सेवकाची मदत घेणे,

आमदारांच्यामदतीने कोरोणा पेशंट व नातेवाईकांना विनामुल्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या. तर अन्न व प्रशासकीय मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लवकरच ऑक्सिजन साठा व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देणार असल्याचे आश्‍वासन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|