राहाता – निळवंडेच्या कालव्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. डिसेंबर २०२० अखेर निळवंडेचे पाणी लाभक्षेत्राला मिळेल, याची जबाबदारी माझी आहे. १२०० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने कालव्यांच्या खोदाईला सुरुवात झाली. विखे पाटलांना बदनाम करण्याचे काम काहिंनी केले, कामे सुरु झाली.
निळवंडे कालवा कृती समिती आता कशाला? असा सवाल करत पाणी येणार आहे. तुमची प्रामणिक भूमिका असेल तर या समितीने थांबले पाहिजे. मात्र आता ही समिती वरच्या लोकांची सुपारी घेवुन या मतदार संघात आमच्या विरोधात बोंबा मारतात, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील जिरायती टापूतील केलवड या गावी प्रचारा निमित्त अयोजित सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाबासाहेब गमे हे होते. सुभाषराव गमे, पी. डी. गमे, आरपीआयचे बाळासाहेब गायकवाड, सुनिल बनसोडे, शंकरराव डांगे, भगवानराव डांगे, डॉ. संभाजी डांगे , काळूरजपूत , संजय गोडगे , अॅड . नकूल वाघे , नामदेव घोरपडे , बाळासाहेब गमे, अॅड. अनिल गमे, भारत राउत यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
निळवंडेंच्या कालव्यांना विखे पाटील विरोध करतात, पुर्वी अशी ओरड उत्तरेतील आमदार करत होते, हे सर्व एका दमात बोलायचे, त्यांच्या या नितीमुळे आमची बदनामी होत होती. वास्तविक निळवंडेचे कालव्याचा अकोले, संगमनेरच्या घुलेवाडीला पत्ताच नव्हता. विरोध असता तर धरणाचे काम झाले असते का? आपण निळवंडे धरणग्रस्तांचे २० मुले सर्व्हिस घेतले, कायम केले.
राज्याचे मुख्यमंत्री व आपले व्यक्तिगत संबंध असल्याने आपण पिचड यांना तयार केले. अकोले तालुक्यातील धरणाच्या मुखापासुन २७ किमी डाव्या कालव्याचे भुसंपादन झाले होते, परंतु जमिन ताब्यात नव्हती. काम होवु देण्यास शेतकरी तयार नव्हते, मात्र, मुख्यमंत्र्यांनी पिचड यांना तयार केले. पिचडांचा विरोध संपविण्यासाठी ते आता भाजप मध्ये आले आहेत. उजव्या कालव्याचे २४ व डाव्याच्या २७ किमी अंतरातील कालव्यांची खोदाई सुरु झाले आहे. आता कृती समिती कशाला पाहिजे?
असा सवाल करुन ना. विखे पाटील म्हणाले. कालव्याचे कामे सुरु झाली. अकोलेत कामे होत आहे, संगमनेर जवळ घुलेवाडीला बॉक्स करून बोगदा कर व पाणी आण. आपल्याकडे अडचण नाही सैनिकी स्कूलची भितीला कृती समिती हार घालुन आली वास्तविक आपण यापुर्वीच अधिकाऱ्यांना लिहन दिलेय की काम सुरु करायाचे त्यावेळी भिंत पाडून टाका. अकोले, संगमनेर तालुक्यात का हार घातला नाही काम होणार आहे, आपण मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे.