मुंबई :- विधानसभेच्या मतदानाचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज ‘वेकअप महाराष्ट्र ‘या हॅशटॅगच्या नावाने ट्विटरवर केलेल्या ट्रेंडला महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांनी भरभरून प्रतिसाद देऊन वेकअप महाराष्ट्राच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले.
विधानसभेचा प्रचार संपायला अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज ‘ वेकअप महाराष्ट्र या नावाने ट्विटरवर ट्रेंड चालविला.
आर्थिक मंदीची महाराष्ट्राला बसलेली झळ गेल्या ४ महाराष्ट्रात बंद पडलेले हजारो कारखाने, मंदीमुळे लाखो लोकांना गमवावा लागलेला रोजगार, भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्रातील १६ हजार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्त्या,
भाजप सरकारच्या राजवटीला जीडीपीने गाठलेला निच्चांक, मंदीमुळे ऍटोमोबाईल क्षेत्राला बसलेली झळ, महाराष्ट्राच्या डोक्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, कृषिक्षेत्राचा गडगडलेला विकासदर, नोटाबंदी आणि जीसीएसटीमुळे देशोधडीला लागलेला व्यापार आणि उद्योग,
बीएसएनएल, एअरइंडिया या कंपन्यांचा भाजप सरकारने केलेला खेळखंडोबा, भाजप सरकारच्या स्मार्टसिटी योजनेतील फोलपणा आणि मुंबईच्या आरे कॉलनीतील वृक्षतोड आदी मुद्दे घेऊन युवक काँग्रेसने शनिवारी (दि. १९) दिवसभर ट्रेंड चालविला.
महाराष्ट्र युवक काँग्रेसने ट्विटरवर चालविलेला ‘ वेकअप महाराष्ट्र ‘ हा ट्रेंड महाराष्ट्रात सुपरहिट झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोट्यावधी लोकांनी ट्विट आणि रिट्विट करून युवक काँग्रेसच्या अभियानाला मोठा हातभार लावला, अशी माहिती युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त यांनी दिली.
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
- आधी नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करा नंतरच पाणीपट्टी दरवाढ करा : अॅड. आगरकर
- काकडी, आद्रक, शिमला मिरची, चवळी, गवार स्थिर
- शालेय सहली ठरताहेत ‘एसटी’ ला लाभदायी ! हिवाळ्यातील भ्रमंतीला शाळांचे प्राधान्य, एसटीच्या उत्पन्नात वाढ
- जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा बदली करून घ्या ! जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा इशारा ; पारनेर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक