मुंबईत भाजपाला झटका! ‘या’ आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- मुंबईत भाजपाला एक झटका बसला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत, आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन हाती बांधून घेत, खांद्यावर शिवसेनेचा भगवा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मागील काही काळापासून ते भाजपात अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते. शिवाय, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर, कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची देखील मागणी केली होती.

एवढच नाही तर रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचंही हेगडे यांनी सांगितले होते. कृष्णा हेगडे हे आता भाजपामध्ये येण्याअगोदर ते मूळचे काँग्रेसचे आहेत.

माजी आमदार असलेल्या कृष्णा हेगडे यांनी, काँग्रेसच्या तिकिटावर विलेपार्ल्यातून विधानसभेची निवडणूकही जिंकली होती. चार वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना कृष्णा हेगडे यांनी त्यावेळचे तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता.

२००९ साली कृष्णा हेगडे यांनी विलेपार्ल्यातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१४ साली भाजपाच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला.

त्यानंतर तीन वर्षांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे ते जावई आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment