राज ठाकरे म्हणाले, भाजपा शिवसेना सत्तेत असताना नामांतर का केलं नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करण्यासाठी भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

त्यावरून भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर का केलं नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना त्यांनी शहराचे नामांतर केले नाही, मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कसले राजकारण करत आहात?, सत्तेत असताना तुम्हाला कुणी रोखलं होतं? असे प्रश्न करत भाजप शिवसेनेवर राज ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला.

राज ठाकरे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार असताना अनेक शहरांची नावं बदलली, दिल्लीतील रस्त्यांची नावं बदलली. मग औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही? महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर नामांतराचा विषय आणायचा आणि जनतेची फसवणूक करायची हेच चालत आलं आहे.

त्यामुळे संभाजीनगरची जनता भाजप आणि शिवसेनेचा योग्य समाचार घेईल असा आशावाद राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गुरूवारी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना घेराव घालत घोषणाबाजी केली व शिवसेनेच्या निषेधाची पत्रं चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर भिरकावली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment