अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा येथे माऊली निवासस्थानी तालुक्यातील सर्व बुथ प्रमुखांची विशेष बैठक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहिताचे केवळ अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाहीत तर यशस्वी अंमलबजावणी करण्याचे कामही केले.
यामुळेच देशात अभिमानाने म्हटले जाते की, “मोदी है तो मुमकीन है”. आदरणीय मोदीजींनी घेतलेले महत्वपुर्ण निर्णय तसेच भाजपा ची ध्येय धोरणे या विषयी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मा.श्री. राजेंद्र गावित यांनी बुथ प्रमुखांना जनतेच्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील व पक्षाचे काम कशा प्रकारे वाढवता येईल हे मुद्देसूदपणे समजावून सांगितले.
तसेच राममंदीरा विषयी पक्षाच्या भूमिकेचा उल्लेख करतानाच राम मंदिर उभारणीसाठी मदत करण्याचे आव्हानही त्यांनी केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार पाचपुतेंनी भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना तालुक्यातील विकास कामांसाठी सरकारने किती मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला याची खडानखडा माहिती कार्यकर्त्यांना दिली.
भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांचा व पक्ष शिस्तीचा दाखला देत असा शिस्तप्रिय पक्ष व कार्यकर्ता हे दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये पहाण्यास मिळणार नाही फक्त भाजपा मध्येच पहायला मिळतील असे गौरवउद्गार पाचपुते यांनी काढले.
व पक्षसंघटना वाढीसाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन प्रमुख पाहुणे व बूथ प्रमुखांना दिले. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा श्रीगोंदा यांच्या वतीने तालुकाध्यक्ष श्री. संदीप नागवडे यांनी उत्कृष्टपणे केले होते.
बाळासाहेब महाडिक यांनीही स्वतःचे पक्षातील अनुभव सांगत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नागवडे यांनी तर दत्ताजी हिरानावळे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, मनोज कुलकर्णी, संतोष रायकर,दादासाहेब ढवाण, बापुतात्या गोरे, रमेश तात्या गिरमकर, अशोक खेंडके, संतोष खेतमाळीस, संतोष क्षिरसागर, सुहासीनीताई गांधी, जयश्रीताई कोथिंबीरे, दिपक शिंदे, राजेंद्र उकांडे, नितीन नलगे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved