अहमदनगर ब्रेकिंग : पुरुषाचा धड नसलेला मृतदेह आढळला ,कुत्र्याने….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एका पुरुषाचा धड नसलेला मृतदेह कुत्र्याने उकरून काढला असल्याचे समोर आले आहे.

तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणाऱ्या माळरानावर आज (८) सायंकाळी कुत्र्यांनी एक मृतदेह उकरून काढला ही बाब आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली.

तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पुरलेला मृतदेह पुरुषाचा असून त्याचे मुंडके घटनास्थळी आढळुन आले नाही.

त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट असून राखाड्या रंगाची पॅन्ट आहे. मयत पुरुष उंच असून मजबूत शरीरयष्टी आहे. मृतदेहाचे धड घटनास्थळी आढळून आले नसल्याने हा खुनाचाच प्रकार असण्याची अधिक शक्यता आहे.

दरम्यान या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा मृतदेह खून करून पुरला का? या मृतदेहाला इथे आणून पुरले? खुन झाला असेल तर कोणत्या कारणातून झाला या सर्व प्रश्नांची उकल पोलीस यंत्रणेला करावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe