अपघातात तरूण ठार; अज्ञात टॅँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर तालुक्यात टॅँकरच्या धडकेत गोंधवणी येथील दिनेश देविदास कहाणे (वय २८) हा तरूण ठार झाल्याची घटना पुणतांबा रोडवर घडली आहे. याप्रकरणी अज्ञात टॅँकरचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनेश कहाने हा मित्राला त्याची मोटारसायकल देण्यासाठी गेला होता. रात्रीच्या सुमारास चितळीकडे जात असताना आसकर रसवंतीसमोर त्याला टॅँकरने उडवून दिले.

हा अपघात होऊनही टॅँकरचालक न थांबता भरधाव वेगाने निघून गेला. त्यानंतर त्याला साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याला मृत घोषित केले.

या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात टॅँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe