अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आज अहमदनगर शहर दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय तसेच नाट्यगृहासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये देणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ मंत्री यांनी दिली.
नगर महापालिकेचा खर्च उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. तो कमी करावा किंवा उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे, अशी सूचना करत सरकार सहकार्य करेल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले
उड्डाणपुलाला शिवसेनेचे दिवंगत उपनेते राठोड यांचे नाव द्या मंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेना नगरसेवक व पदाधिकार्यांनी शहरातून जात असलेल्या उड्डाणपुलाला शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांचे नाव देण्याची मागणी केली.
उड्डाणपुलाला शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नाव देण्याचा ठराव महापालिकेत घ्या. तो ठराव नगरविकास कार्यालयाकडे पाठवून द्या. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved