फरार आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-गेल्या दोन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीला औरंगाबाद येथे नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. सोमनाथ जगन्नाथ जाधव (रा. चिकठाणा ता. गंगापूर जि.औरंगाबाद, ह.मु निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे पकडण्यात आलेल्या

आरोपीचे नाव आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि.14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दि. 21 मार्च 2019 रोजी चास शिवारातील अश्विनी पेट्रोल पंपावर काम करणारा सोमनाथ जगन्नाथ जाधव याने जमा झालेली 29 हजार 693 रुपये रक्कम संमतीशिवाय लबाडीने चोरून नेली.

या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हा सध्या निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथे राहात असल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली.

सानप यांनी पोलिस पथकाला सूचना देऊन सापळा लावून औरंगाबाद जिल्ह्यात आरोपी जाधव याला पकडण्यात आले. यावेळी आरोपीस खाक्या दाखवताच आरोपी जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली.

चोरून नेलेली रक्कम काढून दिलेली, ती रक्कम जप्त करून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि. 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News