साप चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-शेतातील गव्हाला रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा साप चावल्याने मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

दरम्यान हि दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील चांदा येथे घडली असल्याची माहिती समजते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चांदा येथील येथील शास्त्रीनगर परिसरातील शेतकरी दिनेश दानियल गाढवे (वय 55) हे रात्रीच्या सुमारास आपल्या शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते.

मात्र पाणी देत असताना त्यांच्या पायाला काहीतरी लागल्याचा भास झाला. त्यानंतर त्यांना वेदना सुरू झाल्याने ते घाईघाईने घरी आले. नातेवाईकांना झालेला प्रकार सांगितला.

घरच्या नातेवाईकांनी तातडीने स्थानिक डॉक्टरांना बोलावले. त्यांनी आणि नातेवाइकांनी निरीक्षण केले असता पायाला काही जखम दिसली. त्यावरून तो सर्पदंश असावा अशी शंका आली.

प्राथमिक उपचार केल्यानंतर तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी नेवासा फाटा येथील दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe