अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री व नगर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या 16 जानेवारी रोजी नगर जिल्ह्याचे दौर्यावर येत आहे.
उद्या दुपारी 11 ते 2 या वेळेत स्व आर आर (आबा) पाटील सुंदर ग्रामयोजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना त्यांचे हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत.
तसेच तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र व जिल्हा नियोजन निधीमधून 20 गाड्या पोलीस सेवेसाठी प्रदान करण्याचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जिल्हा पोलिस अधीक्षक, अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच उपस्थित राहणार आहेत.
जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सन 2018-19 मध्ये जिल्हास्तरावर प्रथम – ग्रामपंचायत खडांबे खुर्द (ता. राहुरी ) आणि वाळवणे (ता. पारनेर) यांना विभागून.
सन 2019-20 मध्ये जिल्हास्तरावर प्रथम – ग्रा.पं. गणोरे (ता. अकोले) आणि आव्हाणे बु. (ता. शेवगाव) यांना विभागून. सन 2020-21 मध्ये जिल्हस्तरावर प्रथम – ग्रा. पं. निमगाव बु. (ता. संगमनेर) आणि खडकेवाके (ता. राहाता) यांना विभागून सन 2020-21 मध्ये तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत.
डोंगरगाव (ता. अकोले), निमगाव बु.(ता. संगमनेर), करंजी (ता. कोपरगाव), श्रीरामपूर- जाफराबाद आणिमुठेवडगाव यांना विभागून. खडकेवाके (राहाता), सडे (राहुरी), वडाळा बहिरोबा (नेवासा), राक्षी (शेवगाव), चिचोंडी (पाथर्डी), खर्डा (जामखेड),
कानगुडवाडी आणि कोपर्डी विभागून (कर्जत), मढेवडगाव (श्रीगोंदा), जामगाव (पारनेर) आणि टाकळी खातगाव (नगर) यांची निवड झाल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी कळविले आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved