दोन वाहनांची समोरासमोर धडक ; एक जण जागीच ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरु आहे. जिल्ह्यात रस्ते वाहतूक सप्ताह सुरु असून एकीकडे वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनधारकांना नियमांचे धडे देत आहे , तर दुसरीकडे बेशिस्त वाहनधारक आपल्या वेगाने दुसर्यांना हानी पोहचवत आहे.

नुकतेच एका अपघातात एक जणाला आपला प्रमाण गमवावा लागला आहे. हि घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावर निमगाव खैरी गावच्या शिवारात एचपी पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने समोरुन येणार्‍या जीपला जोराची धडक दिली.

या अपघातात निमगाव खैरी येथील एक जण जागीच ठार झाला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावर निमगाव खैरी गावच्या शिवारात एचपी पेट्रोल पंपाजवळ काळीपिवळी जीप नं. (एमएच 17 टी 5573 ) हिच्यावरील चालकाने बेशिस्त वाहन चालवून जीप नं. (एमजीएम 5457 ) हीस जोराची धडक दिली. या अपघातात जीपमधील हरिभाऊ बाळासाहेब भालेराव (वय 25) हा तरुण ठार झाला.

याप्रकरणी मयताचा भाऊ गणेश बाळासाहेब भालेराव याने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी जीप चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरसे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe