बँकेस दिलेला चेक वटला नाही; न्यायालयाने कर्जदारास केली शिक्षा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-कर्जाचे परतफेडीसाठी संस्थेस दिलेला 5 लाख रुपये रकमेचा धनादेश वटला नाही म्हणून एका कर्जदारास नगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 18 महिन्याची शिक्षा व 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कर्जदार राम अनिल ठुबे, (रा.नेवासा फाटा, ता. नेवासा, जि.अहमदनगर) यांनी नगर येथील श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेकडून बोअरवेल वाहन खरेदी करणेसाठी 16 लाख रुपये कर्ज घेतले होते.

या कर्जाचे परतफेडीसाठी त्याने संस्थेस 5 लाख रुपये रकमेचा धनादेश दिला होता, तो वटला नाही म्हणून संस्थेनेआरोपी विरुद्ध फिर्यादी संस्थेतर्फे शाखाधिकारी सुनिल पोपट पेहरे यांनी खटला दाखल केला होता.

या खटल्यात आरोपीने घेतलेला बचाव न्यायाधिशांनी फेटाळुन लावला व या कर्जदारास 18 महिन्याची शिक्षा व 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा व सदरची रक्कम न भरल्यास आणखी 6 महिन्याची कैद असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe