खून प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी मुंबईतून केली अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-रमेश काळे खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने थेट मुंबईतून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे याला मेलेली बकरी देतो असे सांगत मोमीन गल्ली परिसरातील काटवनात नेण्यात आले.21 फेब्रुवारी 2017 रोजी विषारी औषध पाजून त्याला मारहाण केली.

त्यात त्याचा मृत्यू झाला होता. गत महिन्यात भिंगार पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यात जावेद शेख हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आल्यानंतर तो पसार झाला होता.संबंधित खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुंबईत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

आरोपी शेख हा ठाणे येथील राबोडीमधील नातेवाईकाकडे तो राहत असल्याची पक्की खबर मिळताच त्या घरावर छापा टाकत जावेद शेख याच्या मुसक्या एलसीबी पोलिसांनी आवळल्या. त्याला पुढील तपासासाठी भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News