शंकरराव गडाख यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे टिकास्त्र !

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-शेतमाल खरेदी करताना राजकीय मापदंड लावणाऱ्यांना खरे तर लाज वाटली पाहिजे.

हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत.

ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकऱ्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी जगायचेच नाही का.

असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांचा गळा घोटत असल्याची टिका केली आहे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत असलेली शिवशाही,

असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कारखान्याकडून उसतोड होत नसल्याने नेवासा तालुक्यात एका उस उत्पादक शेतकऱ्याने वैतागून आपलाच उभा ऊस पेटवून दिला.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखालील मुळा सहकारी साखर कारखान्यावर आरोप करीत शेतकऱ्याने हे कृत्य केले.या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून,

भाजपने मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह शिवसेनेला लक्ष्य केले आहे.  दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणाऱ्या शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण आहे.

विशेष म्हणजे मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रताप चालविलाय, नेवाशात शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,

ही माझी माफक अपेक्षा आहे. किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका! असे टिकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्टिटरव्दारे केलेआहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe