चोरटयांनी पळविले देवाचे मुखवटे ; या ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात चोरटयांनी कहर केला आहे, दरदिवशी चोरी लुटमारी आदी घटनांमध्ये वाढच होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच अकोले तालुक्यात देवाचे मुखवटे चोरी झाल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील पेंडशेत गावातील हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी देवाचे मुखवटे लंपास केल्याची घटना घडली आहे.

शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या मुखवट्याची किंमत सुमारे ४७ हजार रुपये अशी आहे. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत गावातील हनुमान मंदिर आहे.

या मंदिरात गावातील पुजारी काळू तुकाराम ओळे हे मागील चार वर्षापासून देवाची पूजा करतात. पूजा आटोपल्यावर देव पुन्हा गाभाऱ्यात ठेवले जातात.

शुक्रवारी सकाळी पाच वाजता देवाची पूजा करण्यासाठी ओळे हे गेले असता देवाचे मुखवटे दिसून आले नाहीत. त्यांनी शोधाशोध केली मात्र देवाचे मुखवटे कोठेही आढळले नाही. देवाचे मुखवटे चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe