अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- बाजारात सध्या कांदा, हिरवी मिरची, पालेभाज्या व काही फळांचे दर चांगले वाढले आहेत. या दरवाढीमुळे मात्र शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईच्या वणव्यात कुठेतरी अल्पसा आधार मिळत असल्याचे दलासादायक चित्र आहे.
कांद्याला ४४ रूपये किलो,तर मेथी १० ते १५ रूपये जुडी, कोथ्िबिंीर १० तर हिरवी मिरची ४० ते ६० रूपये किलो,शेवगा ३५,वांगी २५,गवार ८५ रूपये,कारले ४० रूपये किलो या दराने विकली जात आहे.
वातावरणातील झालेल्या विविध बदलांमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी आवक कमी होत आहे.आवक घटत असल्याने दर वाढत आहेत. सध्या बाजार समितीत फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिच्या फळांना दर देखील चांगले मिळत आहेत. आजवर आपण सर्वसाधारणपणे सफरचंद हे महागडे फळ समजले जात.
मात्र येथे झालेल्या फळांच्या लिलावात हे ग्रहित मोडित काढले असून कालच्या लिलावात सफरचंदापेक्षा डाळिंबाने अधिक भाव खाल्ला. यात डाळिंबाला उच्चांकी म्हणजेच १४ हजार रूपये क्विंटल एवढा दर मिळाला.
तर सफरचंदाला ११ हजार रूपये, मोसंबीला ६५०० रूपये, संत्रा ६०००, रामफळ ७०००,द्राक्षे ५००० रूपये,अंजिर ४००० तर सर्वांत कमी दर अननसाला अवघा ४०० रूपये क्विंटल दर मिळाला. सध्या बाजारात फळांचा राजा समजला जाणारा हापूस आंबा दाखल झाला असून त्याला ४ हजार रूपये दर मिळाला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved