अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-नगरचा इतिहास जपला पाहिजे. ऐतिहासीक वास्तूचे जतन झाले पाहिजे यासाठी जयंत येलूलकर हे कायमच दक्ष असतात.
नगरमधील भूईकोट किल्ल्याची दुरावस्था झाली असून बुरूज केव्हाही कोसळेल, हे चित्र येलूलकर यांनीच जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे येलुलकर यांनी पुण्यात खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. दरम्यान छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा मृत्यू नगरच्या ज्या किल्ल्यात झाला त्याची दुरावस्था झालीय.
तुम्ही यावं, ते पहावं.. त्यातून किल्ला संवर्धनाचा प्रश्न तरी मार्गी लागेल, अशी विनंती नगरचे साहित्यिक जयंत येलूलकर यांनी खासदार छत्रपती संभाजी राजे यांना घातली.
राजेंनी क्षणाचाही विलंब न करता स्वीय सहाय्यकास बोलावून नोंद करून ठेवा, नगरला जायचे असा शब्द दिला. गेल्यावर्षी मार्च महिन्यात गुढी पाडवा सांस्कृतिक महोत्सवास प्रमूख पाहुणे म्हणून येण्यास छत्रपती संभाजी राजेंनी होकार दिला होता.
तेव्हा छत्रपती चौथे शिवाजीमहाराज समाधीस्थळ व भूईकोट किल्ल्यास भेट निश्चित झाली होती. यावर बोलताना छत्रपती म्हणाले, भूईकोट किल्ल्यात आमच्या पूर्वजांच्या स्मृती आहेत. छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा मृत्यू याच किल्ल्यात झाला.
मी नक्की नगरला येईल. किल्ल्याच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेत असताना त्यांनी दिल्ली येथे संबंधीत अधिकार्यांशी चर्चा ही केली होती. नगरचे तत्कालीन कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्याशी दूरध्वनीवर बोलले होते.
परंतु कोरोना संसर्गामुळे या भेटी होऊ शकल्या नाही. त्यामुळे येलुलकर यांनी पुणे भेटीत पुन्हा आग्रही विनंती करत राजे आपण नगरला यावं अशी गळ घातली. व राजेंनी देखील याला लगेच होकार दिला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved