पारनेर – नगर विधानसभा निवडणूकीत निलेश लंकेच्या विजयात अपेक्षेप्रमाणे पारनेर पंचायत समिती सभापती राहुल झावरे किंगमेकर ठरले आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी तरुण वर्गात मोठी लोकप्रियता मिळवली होती.
परंतू विधानसभेचे उपाध्यक्षआणि शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनी मतदार संघात मोठ्याप्रमाणात विकासकामे करुन पराभवाचा सामना करावा लागला.सलग तीन पंचवार्षिक निवडणूकीत माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी विजय औटी यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका बजावली होती.

परंतू निवडणूकपूर्वीपासून सभापती राहुल झावरे औटी यांच्या स्वभावावर नाराज होते.कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याने सभापती राहुल झावरे यांनी औटीचे नाव यापुढे आमच्या मुखी येणार नाही असे जाहीर केले होते.निलेश लंके यांनी माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे आशीर्वाद घेतल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर सर्वसामान्य जनमाणसात लंकेविषयी सहानुभूती निर्माण होवून निलेश लंकेचा विजय निश्चित झाला होता.
औटींना चौकार मारण्यापासून रोखण्यासाठी सभापती राहुल झावरे यांनी गावोगावी कार्यकर्त्यांना भेटून स्वाभिमान जपण्यासाठी व सत्तेचा दर्प मोडून काढण्यासाठी निलेश लंकेसाठी काम करण्याचे केलेले आवाहन मतदारांना भावले
आणि पारनेरमध्ये पंधरा वर्षानंतर परिवर्तन घडून आलेआहे.विजय औटी व सुजित झावरे एकत्रित मतदारांना साद घातली परंतू मतदारांना औटी व सुजित झावरे यांचे मनोमिलन भावले नाही.सुजित झावरे यांची मदत विजयऔटी यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…