कर्मचाऱ्यांसह ५० पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास होणार दंड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-देशात कोविडची दुसरी लाट सुरु झाल्याचे बोलले जात असून, त्याचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून राज्यातील रुग्णवाढ वेगात वाढत असून, राज्य शासनाने नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत.

त्यानुसार सार्वजनिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना पूर्णत: मनाई करण्यात आली असून अंत्यविधी व लग्न सोहळ्यांच्या उपस्थितीवरही मर्यादा आणल्या आहेत.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आता पोलिसांनाही अधिकार प्रदान करण्यात आले असून

नियमांपेक्षा अधिक गर्दी व कोविड नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना दहा हजारांपर्यंत दंड केला जाणार आहे.

गेल्या चालू महिन्यात जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत एकसारखी वाढ होत आहे. जिल्ह्यात सरासरी १०९ रुग्ण दररोज या गतीने बाधितांच्या संख्येत भर पडत आहे.

जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे निरीक्षणही यानिमित्ताने समोर आले आहे.

त्यातच राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांसह जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणूकाही पार पडल्याने आणि निवडणूकांमध्ये नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याने आटोक्यात आलेली स्थिती बिघडत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनीदि.१५मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू केले असून पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.

त्यासोबतच रात्री १० ते पहाटे ५ यावेळेत अत्यावश्यक कारण वगळता सामान्य नागरिकांच्या हालचालींवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत.

जमावबंदी आदेश लागू झाल्याने अंत्यविधी व पूर्वनियोजित विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीबाबत नियम लागू करण्यात आले असून

अत्यंविधीसाठी २० आणि विवाह सोहळ्यासाठी दोन्ही बाजूची पाहुणे मंडळी व संबंधित ठिकाणचे कर्मचारी मिळून ५०पेक्षा अधिक लोकांना उपस्थित रहाता येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe