महावितरणने पाठविले 80 कोटींचे बिल; धसक्याने वृद्ध थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  कोरोना लॉकडाऊन काळात महावितरणने अव्वाच्या सव्वा बिले काढून सामान्यांना वेठीस धरले आहे. राज्यभरात आता वसुली मोहीम सुरु केली आहे.

थकबाकी असलेल्यांची वीज खंडीत करत सर्वसामान्यांवर कारवाईचे सत्र राज्यात सुरु झालेलं दिसून येत आहे. दरम्यान महावितरणचा एक अजबच कारभार समोर आला आहे. महावितरणने चक्क एका वृद्धाला 80 कोटींचे बिल पाठविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईच्या नालासोपाऱ्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नालासोपाऱ्याच्या निर्मल गावात राईस मिल चालविणाऱ्या एका 80 वर्षांच्या वृद्धाला सोमवारी विज वितरण कंपनीने १० पंधरा हजार नव्हे तर चक्क 80 कोटींचे बिल पाठवून दिले आहे.

हा आकडा पाहताच हे मिल मालक गणपत नाईक यांचे डोळेच पांढरे झाले. उच्च रक्तदाब असल्याने त्यांना थरमरी भरली. यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

2001 पासून त्यांची तांदळाला पॉलिश करण्याची मिल आहे. तेव्हापासून कधी 6 कधी सात हजार तर कधी पन्नास हजार असे वापरानुसार बिल यायचे. ते गणपत नाईक नियमित भरत होते. मात्र, कोरोना काळापासून त्यांची मिल बंद होती.

त्यांनी त्यातील मशिनरीदेखील विकल्याने मिल रिकामी आहे. तरीदेखील त्यांना 80 कोटींचे बिल महावितरणने पाठविल्याने धक्का बसला आहे.

वीजबिलावरून महावितरणची सारवासारव :- यावर महवितरणला विचारले असता त्यांनी ही तांत्रिक चूक असल्याचा खुलासा केला आहे. तसेच गणपत नाईंकांचे वीज बिल हे 80 कोटी नाही तर 6,400 रुपये असल्याची सारवासारव केली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News