अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, असं वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितलं.
त्यामुळं चित्रा वाघ संतप्त झाल्या. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि तक्रार आलेली नाही असं पोलीस म्हणतात.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/02/chitra_wagh_0.jpg)
ते स्वत:हून दखल घेऊ शकत नाहीत का? कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहात? लाज वाटली पाहिजे. पोलीस हे महिलांचे रक्षक आहेत की भक्षक?, अशा शब्दात भाजपच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला.
चित्रा वाघ यांनी गुरुवारी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी घटनास्थळी जात पाहणी केली. त्यानंतर त्या वानवडी पोलिस ठाण्यात गेल्या. तेथे त्यांनी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांना आरोपी विरोधात गुन्हा का दाखल केला नाही,
हे विचारले यावर लगड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, असे संागितले. यावर संतप्त होत वाघ म्हणाल्या,पोलीस कुणाची चाकरी करत आहेत, संजय राठोड या खुन्याला पोलीस वाचवताहेत, असा आरोप त्यांनी केला. या याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.
घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी असतानाही त्यांना सोडून दिले. वानवडी पोलीस हे फक्त दिखावा करत आहेत.
या प्रकरणाचा तपास वानवडी पोलिसांकडून काढून घेऊन तो सक्षम पोलीस अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणी वाघ यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|