अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-एक विवाहित महिला व अविवाहित तरूणाचे अवैध संबंध एका तरूणाने पाहिले.
आता आपल्या या संबंधांची चर्चा तो संपूर्ण गावात करेल या भितीपोटी ती महिला व तिचा प्रियकर या दोघंानी मिळून या तरूणाचा खून केल्याची घटना नांदेड मधील देलगूर तालुक्यातील कुंडली गावात घडली आहे.
जगदिश हानमंत जाधव (वय २७) असे या मृत तरूणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जोडप्याला अटक केली आहे .
याबाबत सविस्तर असे की, या प्रकरणात मिळालेली माहिती अशी कि मौजे कुडली येथील रहिवासी जगदिश जाधव याने गावातीलच एक विवाहित महिला व अविवाहीत शुभम चिलमपाडे यांच्यातील अनैतिक संबंध पाहिले होते.
त्यामुळे या दोघांनी जगदीश गावात आपली बदनामी करेल आणि आपले भांडे फोडेल, या भीतीने संगनमत करून जगदीशला रात्री बोलून घेऊन शेतात (अज्ञात स्थळी ) नेले. तेथे गेल्यावर त्याच्या डोळ्या मिरची पुड टाकून,
गुप्तांगावर वार केला. त्याचा गळा दाबून खून केला. दरम्यान जगदीशचे वडील हनुमंत जाधव यांनी एक जानेवारी २०२१ रोजी पासून मुलगा जगदीश सापडत नसल्याची तक्रार मरखेल पोलीस ठाण्यात दिली होती.
२५ जानेवारी रोजी गावातील एका शेतात कवटी आणि अर्ध शरीर खाल्लेल्या आणि सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना आढळला. यावेळी जगदीशची ओळख पटली नव्हती. मात्र हा खून होता की आत्महत्या हे पोलिसांना समजत नव्हते.
मरखेल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर आणि फौजदार आजित बिरादार यांनी अत्यंत गोपनीय रित्या तपास करून या गुन्ह्याचा तपास लावला. यामध्ये जगदीश जो हरवला होता,
त्याचा खून विवाहित महिला आणि शुभम चिलमपाडे यांनी संगणमत करून केल्याची बाब पुढे आली.
त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास केला असता दोघांनीही आपण खून केल्याची कबुली दिली. केवळ अवैध संबंध पाहिल्याने एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|