अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- इंधनाच्या रोज वाढणाऱ्या दारावरून आता राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या बेसुमार वाढीचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे.
याचा आता थेट अगदी गाड्यांच्या वाहतुकीपासून ते घराच्या किरणा मालापर्यंत सर्वच क्षेत्रांवर दरवाढीचा परिणाम जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आज पेट्रोल दरवाढीविरोधात ‘चूल मांडा’ आंदोलन करणार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रसेतर्फे राज्यभरात चूल मांडा आंदोलन केले जाणार आहे. राज्यातील ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात असेल,
त्या सर्व पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादीतर्फे ‘चूल मांडा’ आंदोलन केले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले. राज्यात ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावलेले असेल किंवा जाहिरात झळकत असेल,
त्या-त्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेउन आंदोलकांकडून गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ हे प्रतिकात्मक आंदोलन केले जाईल, असे चाकणकर यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून चूल मांडा आंदोलनात सहभागी होणार आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|