सरकारचा ‘तो’ उपक्रम ठरला अभिनव : राज्यपालांची सरकारवर स्तुतीसुमने

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  कोरोनाविरोधातील लढा सुरू असून राज्य सरकारने आता मी जबाबदार ही योजना सुरू केली आहे, सरकारचा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. असं म्हणत राज्यपालांनी राज्य सरकारचे एक प्रकारे कौतुकच केले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या भाषणात हे मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात राज्य शासनाने प्रभावीपणे काम केले.

राज्य सरकारने कोरोनासंबंधी मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केली. आरोग्य सुविधांमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्याही वाढवण्यात आली आहे.कोरोना संदर्भात उपाययोजना वाढवण्याची आणि दुसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रात देखील प्रचंड मंदी होती. ही मंदी असताना देखील राज्य सरकारने चांगले काम केले आहे. रोजगार मिळणे सुलभ व्हावे यासाठी सरकारने महारोजगार आणि महाजॉब्ज या पोर्टलची सुरूवात केली.

आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे अंगणवाड्यांमध्ये न येऊ शकणाऱ्या मुलांना आणि गर्भवती मातांना घरपोच शिधा पोहोचवण्यात आला. शाळा बंद परंतु शिक्षण सुरू हा उपक्रमदेखील राबवण्यात आल्याचे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात नमूद केले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe